मावळात हिंदुत्वाचा हुंकार

शिवसेवा प्रतिष्ठानच्या संस्कार वर्गाचा प्रथम वर्धापन दिन लोनावळ्यात उत्साहात साजरा

शिवसेवा प्रतिष्ठानच्या डायरीचे उद्घाटन
शिवसेवा प्रतिष्ठानच्या डायरीचे उद्घाटन
शिवसेवा प्रतिष्ठानच्या डायरीचे उद्घाटन
शिवसेवा प्रतिष्ठानच्या डायरीचे उद्घाटन

शिवसेवा प्रतिष्ठानच्या संस्कार वर्गाचा प्रथम वर्धापन दिन लोनावळ्यात उत्साहात साजरा
12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती (युवक दिन) तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी मागच्या वर्षी शिवसेवा प्रतिष्ठानने लोणावळ्यात नगरपालीका शाळा क्र 1 येथे मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केला होता... या संस्कार वर्गाचा प्रथम वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांनी गीतेचा अध्याय, राम रक्षा,शुभंकरोती, गणपती स्तोत्र, वेगवेगळ्या प्रकारची इतर स्तोत्र, नाटिका, या द्वारे वर्षभर शिकवलेल्या सर्व संस्कारांचे अत्यंत सुंदर प्रदर्शन केले. खूप मोठ्या प्रमाणात पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता आणि मुलांनी तर उत्साहात वेगवेगळ्या वेशभूषा करून सर्व पालकांना थक्क करायचं जणू ठरवूनच टाकलं होतं. या कार्यक्रमाला आवर्जून अँड.श्री संजय वांद्रे, उद्योजिका सौ ब्रिंदा घनात्रा, उद्योजक श्रीअनिश घनात्रा श्री मनोज लौळकर, श्री संजय गायकवाड, श्री प्रशांत पुराणीक, श्री उल्हास पाळेकर तसेच प्रतिष्ठानचे संचालक श्री अजितदादा घमंडे, श्री राजेश कामठे, शिवसेवा प्रतिष्ठानचे शहर प्रमुख श्री राजेश येवले, प्रकल्पाचे समन्वयक श्री प्रमोद देशपांडेसर, शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आकुर्डी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या संचालिका सौ निवेदिता कच्छाव या उपस्थित होत्या. अत्यंत उत्तम प्रकारात हा संस्कार वर्ग लोणावळ्यात सुरू आहे. गणपती अथर्वशीर्ष, गणपतीची स्तोत्र, वेगवेगळ्या प्रकारची इतर स्तोत्र, रामरक्षा, गीतेचे अध्याय आधी मुलांना शिकवून भारतीय संस्कृतीचा आधार आणि गाभा टिकवण्याचं जणू एक माध्यमच शिवसेवा प्रतिष्ठानने सुरू केलेले आहे. या मुलांना उस्ताहाने, आवडीने अन सातत्य ठेउन शिकवणाऱ्या सौ सुचेता खळदकर आणि ऋतुजा मेहता यांचे सर्वांनी मनापासुन कौतुक केले. लोणावळ्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलांना या संस्कार वर्गात पाठवावं असं आवाहन याप्रसंगी सर्व संचालकांनी केलं.. नगरपालिका तसेच नेहमी मदत देणाऱ्या सर्व सज्जन नागरिकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.




शिवसेवा प्रतिष्ठानच्या डायरीचे उद्घाटन
शिवसेवा प्रतिष्ठानच्या डायरीचे उद्घाटन

ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते अशा शिवसेवा प्रतिष्ठानच्या डायरीचे उद्घाटन आज सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केलं....
उद्यापासून ही डायरी वितरणासाठी उपलब्ध राहणार आहे.
शिवसेवा प्रतिष्ठानच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडे आपण या डायरीची मागणी करू शकता...
डायरी घेणाऱ्या प्रत्येक माणूस हा शिवसेवा प्रतिष्ठानचा हितचिंतक व्हावा म्हणून हितचिंतक नोंदणी अभियान ही सुरू करण्यात आलेल आहे...
हे अभियान 15 जानेवारी पर्यंत चालेल...
डायरीच्या उद्घाटनामुळे कार्यकर्ते उत्साहात तयारीला लागलेले आहेत...

काय आहे या डायरीत ..?
काय वैशिष्ट्य आहे....??
* शिवसेवा प्रतिष्ठान ची संपूर्ण माहिती तर आहेच....
पण बरोबरीन महत्वाची पुढील माहिती सुध्दा आहे...
# हिंदुस्थानाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या ३५० व्या वर्धापनदिनाची महती
# श्रीशिवछत्रपतींद्वारा प्रारंभित 'श्रीराजाभिषेक शका'ने पूर्णतः आलोकित दैनंदिन व्यवहार
# श्रीशिवछत्रपतींच्या राजाभिषेकानंतर प्रशासन व्यवस्थेत झालेल्या विविध परिवर्तनांची राजमुद्रा, राजध्वज, राजचिन्हे, राजचलन, राजशक, राजव्यवहार कोश, राजसिंहासन, राजधानी, राजमंडळ, राजप्रशासन, राजदुर्ग व्यवस्था, राजमहसूल, राजसामर्थ्य आदि लेखांच्या रूपाने प्रमाणित, सचित्र, अभ्यासपूर्ण मांडणी
# श्रीशिवछत्रपतींद्वारा प्रदत्त 'राजव्यवहार कोशा'ने स्वराज्याला दिलेल्या १३८० संस्कृत शब्दांची सार्थ सूची
# श्रीशिवछत्रपतींच्या राजाभिषेकाबरोबरच युवराजाभिषेक झालेल्या धर्मवीर श्रीशंभुछत्रपतींना काव्यमय अभिवादन 'श्रीशंभुवंदना'
# भारतीय स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या भारतीय कालमापनातील तिथी
# सिंहासनारूढ श्रीमहाराजांचे प्रथमच चरणदर्शन
# सालंकृत गजासनावर आरुढ झालेल्या श्रीशिवछत्रपतींचे अद्भूत चित्र




शिवसेवा प्रतिष्ठान संस्थेच्या संस्कार वर्गाच्या लहान मुलांचा लोणावळा शहरात गणेशोत्सवा निमित्त अभिनव उपक्रम.
bharatmata
bharatmata

भाद्रपद शुध्द चतुर्थी ते अनंत शुध्द चथुर्दशी ह्या कालावधीत लोणावळ्यातील प्रमुख सार्वजनिक मंडळा समोर ,श्लोक, गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण आरती, भजन, जप, गजर असा नित्यक्रम संस्थेच्या मुंलानी केला
रोज सांयकाळी ६.३० ते ७.१५ .हा उपक्रम केला गेला..
श्री गणेश मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री शिवाजी मित्र मंडळ, महाराणा प्रताप मंडळ, भाजी मंडई मंडळ, महाराणा प्रताप मंडळ, रोहीदास मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, तरुण मराठा मंडळ,
अशा सर्व प्रमुख मंडळांच्या गणपतीबाप्पा समोर संस्कार वर्गाच्या लहान मुलांनी सादरीकरण केले...
खड़ा आवाज, सुस्पष्ट उच्चार, शिस्तबध्द बैठक, छान पाठातर, भक्तीमय वातावरण, सर्वच खुप छान होते...
सर्वच गणपती मंडळाचे पदाधीकारी, कार्यकर्ते, गणपती बघण्यासाठी आलेले लोक, पालक सर्वच जण या मुलांचे रोज खुप कौतुक करत होते..
गणपती उत्सवाच्या दहा दिवसात शिवसेवा प्रतिष्ठान च्या या संस्कार वर्गाच्या ऊपक्रमाची खुप छान चर्चा संपुर्ण शहरभर होती..
अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात व्हावेत असेही खुप नागरीकांचे म्हणणे होते..
श्रीमती रुतुजा मेहता, सौ सुचेता खळदकर, यांनी या मुलांकडुन खूप छान तयारी करून घेतली होती..
शिवसेवा प्रतिष्ठान चे श्री राजेश येवले, राजेश कामठे, प्रमोद देशपांडे, प्रशांत हरिचंद्रे, धनंजय चंद्रात्रे आदी कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थीत होते.




तिकोना किल्ल्याचा ट्रेकही यशस्वी1

शिवसेवा संस्थेच्या आत्तापर्यंत असलेल्या कारकिर्दीनुसारच कालचा तिकोना किल्ल्याचा ट्रेकही खूप यशस्वी झाला....
एकूण 143 लोकांनी या ट्रेकमधे सहभाग घेतला....
यात तरुण, लहान मुलं, माता-भगिनी, सर्वांचाच सहभागी होता...
हा ट्रेक नुसती सहल नव्हती...
छत्रपती शिवरायांवरती एक चांगलं व्याख्यानही त्यानिमित्ताने सर्वांना ऐकायला मिळाले....
व्याख्याते श्री रविंद्र पाटील भडगाव हुन खास या व्याख्यानासाठी आले होते...
रुचकर अन्न हेही या ट्रेकचे वैशिष्ट्यच होतं...
ते काम श्री अनंता जेस्ते आणि श्री दुग्रेश गायकवाड यांनी बखुबी केले...
कार्यक्रम खुप यशस्वी अन छान झालाच पण बरोबरीने कार्यक्रमाच्या यशस्वीते मागे काही लोकांचे आशीर्वाद रुपी हातही होते त्यांचे आभार मानायलाच हवेत.... लोणावळ्यातील आपल्या सर्वांचे मित्र, चांगल्या कार्यक्रमांचे आधारस्तंभ, एडवोकेट श्री संजय वांद्रे आणि आपले मित्र आर्किटेक्ट श्री दत्तात्रय येवले यांनी या कार्यक्रमाचे भोजन आणि वक्त्यांच मानधन स्पॉन्सर केलं होतं....
जेवताना सर्वांच्या तोंडी काही ना काहीच गोड यायला पाहिजे म्हणून कामशेत मधील युवराज शिंदे यांनी आठवणीनी बुंदी आणली होती आणि स्वतःच्या हाताने ती सर्वांना वाढली सुद्धा.... आपल्या कार्यक्रमात अनेक प्राध्यापक, काही इंडस्ट्रीचे मालक,काही व्यावसायिक बंधू तसेच काही संस्थांचे संघटनांचे नेतेही उपस्थित होते,...
बरोबरीने आपल्या सगळ्यांवरती ज्यांचा आशीर्वाद रुपी हात नेहमी असतो असे आपले माननीय संघचालक श्री अजितजी घमंडे हेही उपस्थित होते...
मी शिवसेवा संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाला सर्वांनी ज्या ज्या प्रकारात मदत केली त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो...
शिवसेवा संस्थेच्या सर्व चांगल्या कामांना आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच असू द्या....
धन्यवाद...

रिफ्रेशर कोर्स कधी ऐकलाय....???2

रिफ्रेशर कोर्स कधी ऐकलाय....???
एखाद्या किल्ल्यावर कधी छान फिरायला गेला आहात...???
एखादा सुंदर ट्रेक कधी केलाय ...????

रिमझिम येणारा पाऊस...
उंच कडा.....
अवघड किल्ला....
अंगावर येणाऱ्या पायऱ्या...
मोठ्या प्रमाणावर माकडांची रेलचेल....
सर्व ठिकाणी धुक धुक आणि फक्त धुकं.....

आज आम्ही शिवसेवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अन साधारणता 143 जण तिकोना किल्ल्यावर सहलीसाठी गेलो.....
काय मजा आली म्हणून सांगू...!!!
एक तर वातावरणातला गारवा ....
हवामान खात्याने दिलेली जोरदार पावसाची धमकी.... रिमझिम पडणारा पाऊस....
अक्षरशः स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं....

तीकोना किल्ल्यावर पोहोचल्या पोहोचल्या आम्ही पहिल्यांदा श्री दुर्गेश गायकवाड़ यांच्या छानशा हॉटेल वर चहा नाष्टा घेतला....
पोह्यांची चव इतकी छान झाली होती की कित्येकांनी दोनदा घेतला ...
त्यानंतर आम्ही श्री रवींद्र पाटील या प्रसिद्ध शिवव्याख्यात्यांच व्याख्यान ऐकलं .....
'छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची युद्धनीती' या विषयावरती ते आमच्याशी बोलले....
खूप अभ्यासपूर्ण अन छान भाषण त्यांनी केलं ....

त्यानंतर आम्ही घोषणा देत गर्जना करत गड चढलो...
एवढ्या गारव्यात सुद्धा सगळे घामाघूम झालो...
बालेकिल्ल्यावर पोहोचलो....
महादेवाचे दर्शन घेतलं.....
आणि खूप देशभक्तीपर गीत म्हटली....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या....
आसमंत दुमदुमून टाकला...
मजा आला .....

खरं सांगू पहिल्यांदाच असं वाटलं की ज्यांना आपण बोलवलं आणि जे आले नाहीत किंवा येऊ शकले नाहीत ते किती कमनशीबी आहेत.....
खरं तर अशे ट्रेक, सहली, सहकुटुंब सहपरिवार आपण नेहमी काढायला हव्यात....
आपल्याबरोबरची लहान मुलं,आपला परिवार यांना स्वराज्याचे वैभव दाखवायला हवं, छत्रपतींच्या गोष्टी सांगायला हव्या ..
या भूमीच्या, या मातीच्या देखण्या वैभवाचा परिचय करून द्यायला हवा....
तरच ना त्यांच्यात देशभक्ती रुजेल....
आज मला हे पटल आणि वाटलं आमच्याबरोबर आलेल्या सगळ्या मित्रांनी आपल्या आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन आले, किती बर केल...
काही जणांची मुल खूप छोटी होती काही जणांची थोडी मध्यम, तर काही जणांची मोठी मुलं होती...
ती गप्पा मारत होती छत्रपतींच्या आणि देशभक्तीच्या घोषणा देत होती...
हे सर्व पाहून मन शांत होऊन गेलं ....
आगामी काळात हे सगळं वैभव सांभाळणारी एक पिढी तयार होती आहे याचा विश्वास वाटला ....
परत खाली आल्यावर ती आम्ही छानस जेवण केलं....
पत्रावळी वरती भात, वरण, भाजी, लोणचं, आणि थोडीशी बुंदी काय मजा आली सांगू ....
अमृता समान जेवण लागत होता....
सगळ्यांनी मनापासून जेवण केलं.... या सगळ्या ग्रुपमध्ये कोणी इंडस्ट्रीच मालक होतं ...
कोणी शिक्षक होतं...
कोणी पीएचडी झालेले मान्यवर होते ....
कुणी विद्यार्थी होते ....
कोणी उद्योजक होते....
कोणी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्यांचे आणि पदांचे संघटनेचे अधिकारी होते....
मातृशक्ती होती....
या सगळ्यांना या रिफ्रेशर कोर्स मधून जाताना, समाधान त्यांच्या सर्वाच्या चेहऱ्यावर पाहताना आज मन प्रसन्न झालं....
तिकोना किल्ल्याचा आमचा ट्रेक सफल झाला ...
चला पुढच्या ट्रेकची तयारी करूया अजून दोन /तिन महिन्यांनी....
काय , येणार ना ??