शिवभावे जीवसेवा

सेवा हे यज्ञकुंड समिधासम हम जलें ।
ध्येय महासागर में सरितरूप हम मिले ।

ग्राम विकास : नागनाथ पार ठाकूरवाडी
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान


गिरीकुंदरातून घोर वनातून जे वसलेले जन ।
अज्ञानाने , दारिद्र्याने पिढ्या पिढ्या पिचलेले जीवन ।।
स्पर्श तयांना करू सह्नमय जीवन त्यांचे उजळू कणकण ।
हृदयातील सदभावना जागवून सेवा भावे करूया अर्चन ।।
शाळा केंद्र मानून पुढील योजना पूर्ण केल्या..
सह्याद्रीच्या डोंगरातील खंडाळा यातील नागनाथ पार व ठाकुरवाडी या दुगर्म भागातील शाळांमधील विद्याथ्यार्ना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, थंडी पासून बचाव व्हावा म्हणून स्वेटर वाटप केले.

Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान

जनसेवा ही ईश्वरभक्ती |
बोध यातला उमजूया ||
सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात ई लर्निंगची आवश्यकता लक्षात घेऊन “शिवसेवा प्रतिष्ठान” व रोटरी क्लब, पुणे यांच्या सहकायार्ने दोन्ही गावातील शाळांना 2 संगणक संच देण्यात आले आहे.

Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान


नागनाथ पार या गावातील सर्व कुटुंबाना कारलें, घोसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, पापडी इत्यादी वेल भाज्यांच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. ज्यांचा उपयोग त्यांना थोडा आर्थिक हातभार लावण्यासाठी होऊ शकेल.
वृक्ष दत्तक व संवर्धन योजना
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ...

वृक्ष दत्तक व संवधर्न योजना या उपक्रमा अंतगर्त २०१९ या वर्षी नागनाथ पार व मावळ तालुक्यातील सुमारे ५० गावांमध्ये रानमेवा सहज उपलब्ध व्हावा व आर्थिक हातभार लावावा या हेतूने आंबा, फणस, जांभूळ, आवळा इत्यादी फळांची कलमी रोपे लावण्याचा उपक्रम झाला. या उपक्रमात साधारण १५० सहकाऱ्यांच्या आिण ७ समाजसेवी संस्थांच्या सहभागाने ५० पेक्षा अिधक गावांमध्ये संपर्क करून सुमारे १००० झाडांचे वृक्षारोपण केले.
अखंड भारत संकल्प दिन
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान

संकाटो पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा

अखंड भारत संकल्प दिनांक १४ ऑगस्ट २०१९

१४ ऑगस्ट १९४७ रोजी रोजी खंडीत झालेल्या मातृभूमीला पुन्हा अखंड करण्याचे ध्येय साध्य करण्याचा संकल्प या कायर्क्रमात करण्यात आला कायर्क्रमात मोठ्या संख्येने नागिरक उपिस्थत होते.
पूरग्रस्तांना मदत - २०१९
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान


सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या पुरात झालेल्या हानी मध्ये देवले ग्रामस्थ व “शिवसेवा प्रतिष्ठान” ने खारीचा वाटा उचलला आहे व चांगली मदत केली.
जागतिक आपदा "कोरोना" संकट व सेवा कार्य
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान


२०१९ वर्ष जसे-जसे पुढे जात होते तसतशी जागितक आपदा "कोरोना" ने सुमारे सर्व जग संकटातून जात होते. आपल्या देशात अनेक स्तरांवर विविध माध्यमांतून समाजातील गरजू बांधवाना मदतीचा हात मिळत होता…
मावळ तालुक्यात असंख्य हातावर पोट असणारी कुटूंब रोजंदारी शिवाय उपासमारीने त्रस्त झालेली होती. मदतीची आत्यंतिक गरज होती. “शिवसेवा प्रतिष्ठान” ने नागनाथ येथील प्रत्येक पिरवाराकिरतां घरपोहोच कोरडा धान्य शिधा वाटप हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. अनेक मित्र -पिरिचत, संस्था व व्यक्तींचे मदतीचे हात पुढे आले.
नागनाथपार येथील एकूण ५३ परिवाराणकर्ता घरहोपोच कोरडा धान्य शिधा वाटप हा उपक्रम राबवला गेला. यासाठी आपल्या सारख्या मित्रमंडळी, दानशुर संस्था व व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे, खरं तर त्यामुळेच हे शक्य झाले...
लोणावळा जवळील तैलबैल , एकोले, भांबुर्डे, आडगाव येथे साधारण १६० कुटुंबाना तातडीने धान्य किट ची गरज आहे अशी माहिती मिळताच त्यादृष्टीने सवर्तोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
IRCTC च्या सहयोगाने कर्वेनगर व पुणे स्टेशन येथे खिचडी वाटप
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान


कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी फारच विचित्र - विदीर्ण अवस्था पाहायला मिळत होती. अचानक आलेल्या या संकटाचा सामना तरी कसा करावा? हा अनेकांच्या मनातला यक्ष प्रश्न होता. त्यातही हातावर पोट असणाऱ्या, छोटे मजूर, कामगार, यांना तर उत्पन्न नाही आणि बाहेर LOCKDOWN मुळे काही मिळतही नाही, अक्षरशः पोटापाण्याचा प्रश्न अनेकांना भेडसावत होता.

रेल्वे प्रशासन ( IRCTC ) या बाबतीत छान उपक्रम करत होते, त्याच्या अनुषंगाने आणि रेल्वे प्रशासनाच्या (IRCTC) सहकायार्ने “शिवसेवा प्रतिष्ठान” सुद्धा आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. पुणे स्टेशन, कर्वेनगर या ठिकाणी साधेच पण स्वछ व पौस्टिक अन्न म्हणून “डाळ-खिचडी” चे गरजवंताना वाटप केले आणि या सत्कायार्त हातभार लावण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी याचा लाभ घेतला.
जून २०२० चे चक्रीवादळ
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान


जून २०२० ला चिक्रवादळात अनेकांचे अतोनात नुकसान झाले होते, नेहमी जातो त्या नागनाथ गावची स्थिति तर फारच विदारक झाली होती, संपुर्ण गावात एकाही घरावर छ्प्परच राहील नव्हतं, अनेक घरांची पडझड झाली होती.

“शिवसेवा प्रतिष्ठान” ने तातडीची मदत म्हणुन किमान वेगवेगळ्या मापाचे १५० पत्रे, व त्याला बसवण्याच्या वायर अन् खिळ्यांसकट तातडीने मदत पाठवली. शिवसेवा संस्थे च्या कार्यकर्त्यांनी नागनाथ गावात घरा वरील पत्रे देण्याचे ठरवले. तसे आवाहन करण्यात आले, सर्वानी धावपळ केली आिण सकाळी गावकऱ्यांना बोलावुन रु.६०,०००/- चे पत्रे गावात पोहचले. घरे दुरुस्तीचे काम वेगात सुरु झाले. हे सर्व आपण सर्वानी संस्थेवर विश्वास दाखवुन लगेच केलेल्या मदतीमुळेच… खुप खुप धन्यवाद !!
सांगीसे गावातील मुलांना अभ्यासाला मदत - २०२२
Shivseva, शिवसेवा प्रतिष्ठान


शिवसेवा प्रतिष्ठान 🚩
24.12.22 रोजी प्रतिष्ठान तर्फे कामशेत जवळील सांगीसे गावात असलेल्या बोधिसत्व प्रतिष्ठान च्या ग्रामीण भागातील शाळेत दहावीच्या 25 मुलांसाठी अपेक्षित प्रश्नसंच (9 पुस्तकांचा सेट ) मुलांना अभ्यासाला मदत म्हणून देण्यात आला. या मदतीसाठी प्रतिष्ठान ला आपले हितचिंतक श्री विनोदजी यांनी सहकार्य केले.... खूप छान कार्यक्रम झाला..
नवनीत चे 21 अपेक्षित प्रश्नसंच मिळाल्यामुळे शिक्षक आणि मुले दोघेही खुश होती... मुलांना अभ्यासात याची खूप मदत होईल असे तिथल्या मुख्याध्यापकांनी आपल्याला सांगितले... चला असेच आवश्यक कार्यक्रम करत राहूया...!